न्यूयॉर्क : सोशल मीडियात अग्रेसर असणारी ट्विटर कंपनी खरेदी केल्यापासून जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क हे सर्वांच्या चर्चेचा विषय बनले आहेत. त्यांनी केलेल्या प्रत्येक विधानाची चर्चा जगभरात होताना दिसत आहे. मात्र नुकतेच त्यांनी केलेल्या एका ट्विट जोरदार चर्चा जगात होताना पाहायला मिळत आहे. या ट्विटमध्ये मस्क यांनी संशयास्पदरित्या मृत्यूबाबत ट्विट केलं आहे. या ट्विटवर युजर्सच्या संमिश्र आणि काळजीच्या प्रतिक्रिया उमटत असल्याचे दिसत आहे.
अलिकडेच एलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी विकत घेतल्यानंतर ते चर्चेचा केंद्र बिंदू ठरले आहेत. एलॉन मस्क यांनी या चर्चित ट्विटमध्ये लिहीले आहे की,’जर माझा संशयितरित्या मृत्यू झाला तर चांगलं होईल.’मस्क यांचे हे ट्विट अगदी काही वेळातच प्रचंड व्हायरल झाले आहे. नेटकरी मस्क यांच्या ट्विटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. मस्क यांच्या ट्विटनंतर त्यांच्या जीवाला धोका तर नाही ना, अशा चर्चा आणि भीती व्यक्त करण्यात येत आहे. अनेक युजर्सने या ट्विटला रिट्विट करत वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत.
If I die under mysterious circumstances, it’s been nice knowin ya
— Elon Musk (@elonmusk) May 9, 2022
एलॉन मस्क यांचे हे ट्विट खुपच चर्चेत आहे. या ट्विटनंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. मस्क यांच्या ट्विटनंतर नेटकरी चांगलेच गोंधळात सापडले आहेत. मस्क यांच्या ट्विटचा अर्थ कुणालाही कळलेला नाही. मात्र, मस्क यांच्या ट्विटमध्ये Nice Knowin Ya या गाण्याचा उल्लेख असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मस्क यांनी उल्लेख केलेलं गाणं TWENTY2 या बँडचे आहे.
एलॉन मस्कने अलिकडेच ट्विटर खरेदी केल्यानंतर स्पष्ट केलं आहे की, भविष्यात ट्विटर वापरण्यासाठी वापरकर्त्यांना शुल्क द्यावं लागेल. एलॉन मस्क यांनी ट्विट करून यासंबंधित माहिती दिली. एलॉन मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “ट्विटर नेहमीच कॅज्युअल युजर्ससाठी विनामूल्य असेल. परंतु व्यावसायिक आणि सरकारी युजर्सना यासाठी थोडी किंमत मोजावी लागू शकते.”