Elon Musk meets Prime Minister । अमेरिकन अब्जाधीश आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. वॉशिंग्टनमध्ये काल दोघांची भेट झाली. पंतप्रधान मोदींनी या बैठकीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या चित्रांमध्ये मस्कची मुले देखील दिसत आहेत. दोघांमध्ये तंत्रज्ञान, स्पेस आणि मोबिलिटी यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
‘या’ मुद्द्यांवर चर्चा झाली
पंतप्रधान मोदींनी दोंघांमधील भेटीची माहिती एका पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये, “मस्क यांच्यासोबतच्या भेटीदरम्यान, स्पेस, मोबिलिटी, टेक्नोलॉजी आणि इनोवेशन यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. याशिवाय, पंतप्रधान कार्यालयाने देखील पुष्टी केली आहे की एआय, उद्योजकता आणि सुशासन यावर चर्चा होईल. अनेक अहवालांमध्ये असे म्हटले आहे की, भारतात स्टारलिंकच्या सेवेबाबत दोघांमध्ये चर्चा झाली आहे. स्टारलिंक भारतात त्यांची सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करू इच्छिते. यासाठी त्यांनी सरकारच्या अटी मान्य केल्या आहेत, परंतु अद्याप त्यांना हिरवा कंदील मिळालेला नाही.
It was also a delight to meet Mr. @elonmusk’s family and to talk about a wide range of subjects! pic.twitter.com/0WTEqBaVpT
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2025
नेमकी अडचण काय आहे?
स्टारलिंकला अद्याप भारतात स्पेक्ट्रम वाटप झालेले नाही. खरं तर, स्टारलिंकला स्पेक्ट्रमचे वाटप व्हावे असे वाटते, त्यासाठी बोली लावावी असे नाही. दुसरीकडे, रिलायन्स जिओ याला विरोध करत आहे आणि स्पेक्ट्रमसाठी बोली लावण्याची मागणी करत आहे. भारत सरकार या प्रकरणात स्टारलिंकच्या बाजूने आहे आणि स्पेक्ट्रम वाटपाबद्दल बोलत आहे. सध्या स्टारलिंकचा अर्ज सरकारकडे आहे आणि लवकरच या संदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो असे मानले जाते.
स्टारलिंक सेवा महाग होणार Elon Musk meets Prime Minister ।
स्टारलिंक सेवा महाग होणार आहे आणि लोकांना त्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतील. इन्स्टॉलेशनसाठी २०,०००-३०,००० रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो आणि कंपनीच्या मासिक योजना ८५० रुपयांपासून ते अनेक हजार रुपयांपर्यंत असू शकतात.