कोलकाता – आयपीएल 2022 आता शेवटच्या टप्प्यावर आहे. मंगळवारी झालेल्या पहिल्या क्वालिफायरनंतर गुजरात टायटन्सने अंतिम फेरी गाठली असून आता ते दुसऱ्या अंतिम फेरीतील खेळाडूच्या शोधात आहेत. आज लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा संघ कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर एलिमिनेटर सामन्यात आमनेसामने आहेत.
एलिमिनेटर सामन्यात, लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात लखनौ संघाने दोन मोठे बदल केले आहेत. जेसन होल्डर आणि कृष्णप्पा गौतमच्या जागी कृणाल पांड्या आणि दुष्मंता चमीरा याचा संघात समावेश करण्यात आला आहे. बंगळुरू संघात एकमेव बदल करण्यात आला आहे. मोहम्मद सिराजचे पुनरागमन झाले आहे तर सिद्धार्थ कौलला वगळण्यात आले आहे.
🚨 Toss Update 🚨@LucknowIPL have elected to bowl against @RCBTweets in Eliminator of the #TATAIPL 2022. #LSGvRCB
Follow the match ▶️ https://t.co/cOuFDWIUmk pic.twitter.com/NkIF1x55cF
— IndianPremierLeague (@IPL) May 25, 2022
दोन्ही संघांचे प्लेइंग-11 :-
लखनौ सुपर जायंट्स : क्विंटन डी कॉक, केएल राहुल (c), एविन लुईस, दीपक हुडा, मनन वोहरा, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, दुष्मंता चमिरा, मोहसिन खान, आवेश खान, रवी बिश्नोई
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर : विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (c), ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, रजत पाटीदार, महिपाल लोमरोर, शाहबाज अहमद, हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, जोस हेजलवुड, मोहम्मद सिराज
दरम्यान, इडन गार्डन्सवर झालेल्या पावसामुळे टॉसला उशीर झाला. सामना जरी उशीरा सुरू झाला असला तरी षटकांमध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही आणि सामना निर्धारित 20 षटकांचा खेळवला जाणार आहे.