‘बिग बॉस12’च्या बाहेर पडलेल्या दोघींनी केला अनुप जलोटा आणि जसलीनच्या नात्याचा खुलासा 

सलमान खानचा विवादित शो ‘बिग बॉस सीजन १२’  मध्ये वकेन्ड का वार  भागात प्रथमच दोन कंटेस्टेंट्स  घरच्या बाहेर गेले. रोशमी बनिक आणि कृति वर्मा बिग बॉस १२ मधून एलिमिनेट होणारी पहिली जोडी आहे. घरच्या बाहेर झाल्यानंतर त्यांनी घरातील काही खुलासे केले. त्यांनी  सर्वात मोठा खुलासा भजन सम्राट अनुप जलोटा आणि त्यांची ३७ वर्षे लहान मैत्रीण जसलीन मथारू यांच्यातील संबधाबाबतचा होता.
६५ वर्षीय अनुप जलोटा आणि त्याची २८ वर्षीय मैत्रीण जसलीन मथारू यांच्या नात्याबद्दल या  भागापासूनच चर्चा होत आहे. लोकांसाठी दोघांच्या नात्याला मान्यता देणे जाड जात आहे. त्यामुळे काही लोक याला पब्लिसिटी स्टंट म्हणत आहते. परंतु, रोशमी आणि कृति यांनी या नात्यातील सत्य समोर आणले आहे. ते म्हणतात की, जसलीन आणि अनुप जलोटा यांच्या नात्यात सत्यता  आहे. सुरुवातीला या दोघींना देखील ते खोटे वाटत होते परंतु त्यांच्या सोबत राहिल्यावर त्यातील सत्यता समोर येते.

https://www.instagram.com/p/BoMtY8Hhxk1/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)