पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – दसऱ्याच्या मुहुर्तावर घराच्या दारात आपल्या आवडीची गाडी पाहिजेच. यासाठी पुणेकरांची महिनाभर अधीच वाहन बुकिंगची गडबड सुरू होते. त्यामुळे यंदाच्या दसऱ्याला नव्याने १० हजार ६०१ वाहने आणि ३६३ ई-वाहनांच्या आरटीओकडे नोंदी झाल्या.
दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाहन खरेदी धिम्या गतीने दिसते. तर ई-वाहन खरेदी निम्याने कमी झाल्याचे दिसून येते.
दसरा साडेतीन मुहुर्तापैकी एक, त्यामुळे यादिवशी सोने-चांदी, विविध वस्तू, कपडे यासह वाहन खरेदी तेजीत असते. दरवर्षी वाहन खरेदीची संख्या ही वाढलेलीच असल्याचे दिसून येते.
यंदा दसऱ्याच्या मुहुर्तावर ६ हजार ७०७ दुचाकी तर २ हजार ९२२ चारचाकी वाहनांच्या नोंदी झाल्या. तसेच रिक्षा, बस, टॅक्सी आणि मालवाहतूक (गुड्स) वाहनांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याची माहिती पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली.
दहा दिवसांत नोंदी झालेल्या वाहनांची आकडेवारी (गतवर्षीच्या तुलनात्मक) (कंसात ई- वाहने)
तारीख दुचाकी कार गुड्स रिक्षा बस टॅक्सी अन्य वाहने एकूण
दसरा – २०२३ ६,१४४ ३,४८२ २१९ ३१८ ३७ ३०९ ८५ १०,५९४
(९०३) (१२०) (७) (१) (०) (०) (०) (१,०३१)
दसरा – २०२४ ६,७०७ २,९२२ ३४६ २६१ २० २३१ ११४ १०,६०१
(३०९) (२६) (१४) (५) (०) (९) (०) (३६३)