‘त्या’ मिरवणुकीतील अकरा मोटारी अन्‌ बारा मोबाइल जप्त

गजा मारणेच्या 17 साथीदारांना अटक

तळेगाव दाभाडे – कुख्यात गुंड गजानन मारणे याची कारागृहातून सुटका झाल्यानंतर तळोजा ते पुणे या मार्गावरून रॅली काढून दहशतीचे वातावरण निर्माण केले. पोलिसांनी त्याचे ड्रोन शूटिंग केल्याप्रकरणी शिरगाव चौकीत पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात पोलिसांनी एक ड्रोन, 11 मोटार, 12 मोबाइल जप्त करत 17 जणांना अटक केली आहे.

सागर सुखदेव थिटमे (वय 25, रा. धायरी, पुणे), संतोष चंद्रकांत शेलार (वय 36, रा. कोंढवे धावडे, पुणे), रघुनाथ चंद्रकांत किरवे (वय 49, रा. भोर, पुणे), सागर वसंत शेडे (वय 29, रा. कोंडवे धावडे, पुणे), मावली रामदास सोनार (वय 20, रा. कोंढवे धावडे, पुणे), आशिष वसंत अवगडे (वय 23, रा. उत्तम नगर, पुणे) यांना 19 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली आहे.

तसेच त्यांचे अन्य साथीदार अनिल राजाराम मदने (वय 42, रा. औंध, पुणे), मयूर अर्जुन गाडे (वय 21), व्यंकटेश व्यंकय्या स्वर्पराज (वय 36), शुभम मनोहर धुमणे (वय 23, दोघेही रा. धानोरी, पुणे), अखिल जयवंत उभाळे (वय 27, रा. विश्रांतवाडी, पुणे), अभिजित विजय घारे (वय 35, रा. बेबड ओहोळ, पुणे), अनिल संपत जाधव (वय 37), निलेश रामचंद्र जगताप (वय 39, दोघेही रा. पुरंदर, पुणे), रोहन अर्जुन साठे (वय 34, रा. येरवडा, पुणे), योगेश राम कावली (वय 28), शैलेश रवींद्र गावडे (वय 30, दोघेही रा. चिंचवड पुणे), यांना 20 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.