अकरा छावण्यांची मान्यता रद्द

कर्जत तालुक्‍यातील 7, तर नगर तालुक्‍यातील 4 चारा छावण्यांचा समावेश

या छावण्या होणार बंद

नगर तालुक्‍यातील विशाल सहकारी दूध उत्पादक संस्था, शेतकरी ग्रामविकास संघ, चांगदेव नारायणडोहो विकास कार्यकारी सेवा सोसायटी, यशांजली ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था. तर नगर तालुक्‍यातील भागिरथीबाई सह.पाणी उपसा संस्था, साई सेवाभावी संस्था, रोकडेश्‍वर शिक्षण संस्था, संकल्प ग्रामीण विकास संस्था, गुरूकृपा विकास संस्था, खुरेंगेवाडी पाईप फिटींग मजूर सहकारी संस्था, जगदंबा मोटार वाहतूक सहकारी संस्था अशा सात नगर तालुक्‍यातील चार एकूण 11 संस्थाची चारा छावणी मान्यता रद्द करण्यात आली आहे.

नगर – छावण्यामध्ये आढळलेला बेशिस्तीचा कारभार आणि ढिसाळ व्यवस्थापनामुळे शुक्रवारी (दि.26) रोजी जिल्ह्यातील 11 चारा छावणीचालक संस्थांना छावण्या बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत. कर्जत मधील 7 तर नगर तालुक्‍यातील 4 चारा छावण्यांचा यात समावेश आहे. त्याचबरोबर तपासणीच्या दरम्यान आढळलेल्या त्रुटी आणि अटी-शर्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी 42 छावणी चालकांवर 1 लाख 80 हजारांचा दंड करण्यात आला आहे.

गेल्या वर्षीब अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीत शेतकऱ्यांचे पशुधन जगविण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात तब्बल 511 चारा छावण्यांना मंजूरी देण्यात आली होती. त्यापैकी 504 चारा छावण्या सुरू होत्या. या छावण्यात लहान-मोठी 3 लाख 35 हजार जनावरे होती. व त्यानंतर जिल्ह्यात सुरू झालेल्या पावसामुळे चारा छावण्यांची संख्या घटली. जुलैच्या सुरुवातीला साडेतीनशे चारा छावण्या बंद झाल्या होत्या. मात्र, पावसाने हुलकावणी दिल्याने पुन्हा चारा छावण्यांची संख्या वाढली आहे.

या चारा छावण्यामध्ये योग्य सुविधा, चारा वेळेवर मिळतात का यासाठी जिल्हा प्रशासन पहिल्यापासून सतर्क राहिले. जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या निर्देशानुसार चारा छावण्यांच्या व्यवस्थापनाची तपासणी नियमितपणे सुरू आहे. तपासणीमध्ये त्रुटी व अटी, शर्तींची उल्लंघन केल्याप्रकरणी चारा छावणी चालक संस्थांवर आज पावेतो साठ लाख रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे.

तपासणीमध्ये चारा छावणी संचालनात गैरव्यवस्थापन आढळल्याप्रकरणी 11 छावण्यांची मान्यता रद्द करीत त्या बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. यामध्ये महसूल, सहकार आणि जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची पथके तैनात करून छावण्यांची अचानक तपासणी करण्यात आली. या पथकांकडून तपासणीचे अहवाल प्रशासनास प्राप्त झाले असून, त्या अहवालानुसार 42 चारा छावणी चालक संस्थांवर 1 लाख 80 हजार रुपये दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.