अकरावी प्रवेश : दोन दिवसांत 10 हजारांवर अर्ज दाखल

 संकेतस्थळ सुरळीतपणे सुरू

पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रांत अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत दोन दिवसांत 10 हजार 298 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत.

अकरावी प्रवेशासाठी अर्जाचा भाग-1 भरण्याची सुविधा सोमवारपासून (दि.27) उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पहिल्या दिवशी काही शाळा व मार्गदर्शन केंद्रांमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, मंगळवारपासून संकेतस्थळ सुरळीतपणे सुरू झाले आहे.

पुणे विभागात दाखल झालेल्या अर्जांपैकी 913 अर्जांची पडताळणीही पूर्ण करण्यात आली आहे. 4 हजार 395 अर्जांची स्वयंचलित पडताळणी करण्यात आली आहे. अद्यापही 4 हजार 990 अर्जांची पडताळणी पूर्ण करण्यात आलेली नाही. ही पडताळणी लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समितीचे अध्यक्ष व पुणे विभागाच्या प्रभारी शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी दिली आहे.

मुंबई महानगर क्षेत्रात 4 हजार 178 विद्यार्थ्यांनी अर्जांची नोंदणी केली असून यातील 219 अर्जांची तपासणी पूर्ण झाली आहे. 2 हजार 154 अर्जांची आपोआप संगणकाद्वारेच तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. 1 हजार 805 अर्जांची तपासणी अद्याप पूर्ण झालेली नाही.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.