अळूच्या पानांमध्ये लोह भरपूर प्रमाणात असतं

अळूच्या कंदाचा उपयोग स्टार्च करण्यासाठी केला जातो

कलोकेशिया एस्क्युलेंटा असं शास्त्रीय नाव असलेली अळूची भाजी ही कंदमूळ या प्रकारात मोडते. ही सुरण कुळातील वनस्पती आहे. मूळची आग्नेय आशियातली ही वनस्पती असून आता आफ्रिका आणि आशिया खंडातील उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये सर्वत्र आढळते. ही भाजी बारामाही उगवणारी असून हिच्या पानांची भाजी आणि वडी करतात. या भाजीचे देठ आणि कंद खाण्याजोगे असतात.

इंग्रजीत या भाजीला ‘तारो’, ‘अ‍ॅरम’, ‘एलिफंट इअर’, हिंदीत ‘आर्वी’ आणि ‘काचालू’, गुजरातीत ‘अळवी’, आणि तेलगुमध्ये ‘शामापंथा’ अशी नावं आहेत. पानं कमळासारखी असून देठ लांब असतात. या भाजीचे दोन प्रकार आहेत. रानटी आणि लागवड केलेली. पैकी रानटी अळूचे कंद खाल्ले जात नाही. त्याची केवळ पानंच खाल्ली जातात.

लागवड केलेल्या प्रकाराच्याही दोन जाती आहेत. गुरीकाचू आणि असुकाचू असे दोन प्रकार असून एकाची पानं आणि देठ हिरवी असतात तर दुस-याची जांभळ्या रंगाची असतात. याशिवायही अळूचे तेरा, पत्राभजी, ब्रह्मराक्षस, रुखाळू असेही प्रकार आहेत. अळू प्रकृतीने थंड असून ती वात-पित्त आणि कफनाशक आहे. महाराष्ट्रात अळूपासून पातळ भाजी(फदफदं), अळूवडी हे प्रकार आवर्जून केले जातात.

  1. अळूच्या पानांमध्ये लोह भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे शरीराला आवश्यक असणारं रक्त वाढण्यास मदत होते.
  2. मलप्रवृत्तीला आळा घालणारी असून बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी ही भाजी खाऊ नये.
  3. अळूच्या कंदाचा उपयोग स्टार्च करण्यासाठी केला जातो.
  4. अशक्तपणा दूर करून शक्ती वाढवण्याचं काम ही भाजी करते.

  5. ताप आलेल्या व्यक्तीला ही भाजी खायला द्यावी. कारण तापामुळे गेलेली तोंडाची चव परत येते.

  6. दूध कमी येत असल्यास बाळंतिणीने आवर्जून ही भाजी खावी.
  7. विषारी प्राणी चावल्यास वेदना कमी करण्यासाठी अळूची पानं वाटून त्याचा चोथा त्या जागी थापावा. आणि पोटात रस घ्यावा. वेदना कमी होतात.
  8. गळू किंवा फोड फुटण्याकरिता अळूची देठं वाटून त्या जागी बांधावी. गळू फुटतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.