नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनानिमीत्त देशात सर्वत्र रोजदार तयारी सुरू आहे. सर्व दुकानांमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी-विक्री सुरू झाली आहे. तर सरकारी कार्यालय, शाळा, महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, अशीच तयारी दिल्लीतील संसद भवनावरही दिसून येत आहे.
#WATCH Dynamic Facade Lighting of the Parliament House Estate. #IndependenceDay2019 pic.twitter.com/XxN4yLHfBd
— ANI (@ANI) August 13, 2019
संसद भवनाच्या इमारतीवर विद्युत रोशनाई करण्यात आली आहे. ही विद्युत रोशनाईचे पंतप्रधानांच्या हस्ते सुरू करण्यात आली. यावेळी पंतप्रधानांसोबत अनेक मंत्री आणि नेत उपस्थित होते. तसेच परिसरातही या दिनासाठी खास तयारी करण्यात येत आहे.
Delhi: Prime Minister Narendra Modi inaugurates the Dynamic Facade Lighting of the Parliament House Estate. pic.twitter.com/xEmWm8kw8W
— ANI (@ANI) August 13, 2019
देशात काश्मीरबाबत ऐतिहासिक निर्णय संसदेत घेतला गेल्याने यंदाचा स्वातंत्र्य दिन खास आहे. त्यामुळे यंदा संसद भवनाची इमारतही खास पद्धतीने सजवण्यात आली असल्याचे दिसत आहे.