लिथियम आयन बॅटरी नव्या पद्धतीने विकसित करण्याचा शोध
नवी दिल्ली – जपानमधील निस्सान कार कंपनीत बॅटरी क्षेत्रात गेल्या तीस वर्षांपासून संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञाने बॅटरी रचनेची नवी पद्धत विकसित केल्याचा दावा केला आहे. सध्या बाजारपेठेत असलेल्या महागड्या लिथियम आयन बॅटरीपेक्षा ही बॅटरी 90 टक्के स्वस्त असणार आहे. त्याचबरोबर लिथियम आयन बॅटरीसंदर्भात सुरक्षाविषयक काही अडचणी आहेत. नवी बॅटरी त्यापेक्षा कितीतरी सुरक्षित असणार असल्याचे या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
हिदेकी होरी असे या शास्त्रज्ञाचे नाव आहे. निस्सानची लिफ इलेक्ट्रिक कार विकसित करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सध्याचे बॅटरी ज्या पद्धतीने जुळवली जाते. यामध्ये त्यांनी काही सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे ही जुळवणी अतिशय सोपी झाली असून या बॅटरीची सुरक्षितता जास्त असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परंपरागत बॅटरीबाबत ते म्हणतात की, यामध्ये सेमीकंडक्टर ज्या पद्धतीने विकसित केले जातात आणि जुळवले जातात अशी पद्धत वापरण्यात येते. आम्ही पोलाद निर्मिती करताना जी पद्धत वापरतात ती पद्धत वापरण्याची यंत्रणा विकसित केली आहे. मेटल लाइनड इलेक्ट्रोड्स आणि लिक्विड इलेक्ट्रोलाइडइस् जुळवण्याची पद्धत बदलण्यात आली आहे. टोस्टवर लोणी जितक्या सहजपणे लावले जाते तितक्या सहजपणे नवी बॅटरी जुळविली जाते, असे एपीबी कॉर्पोरेशनमध्ये कार्यरत असलेले होरी म्हणाले.
लिथियम आयन बॅटरीची जनक सोनी कंपनी आहे. काही दशकांपूर्वी त्यांनी ही बॅटरी विकसित केली. ही बॅटरी सध्या स्मार्टफोन आणि इलेक्ट्रिक कारमध्ये वापरली जाते. ती महागडी असल्यामुळे आणि असुरक्षित असल्यामुळे कार निर्मिती क्षेत्राला अजूनही किफायतशीर करता आलेले नाही. मात्र, सध्या हेच तंत्रज्ञान जगाला अवगत असून हे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञांना 2019 मध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. लिथियम आयन बॅटरी सध्या विविध क्षेत्रांत वापरल्या जातात. लिथियम आयन बॅटरी असुरक्षित असल्याचे बोलले जाते. सॅमसंग स्मार्टफोनमध्ये अनेक स्फोट झाले होते. जर नवे तंत्रज्ञान यशस्वी ठरले तर बॅटरी क्षेत्रात आमूलाग्र क्रांती होईल. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहने कमी खर्चात चालविली जाऊ शकतील. नव्या बॅटऱ्या लवकर तयार होण्याची गरज आहे.