निवडणूकज्ञान

निवडणूक उद्देशांसाठी घेण्यात आलेल्या वाहनांवर निर्बंध आहेत का ?
निवडणूक कामासाठी उमेदवार कितीही वाहने भाडेतत्त्वावर घेऊ शकतात. परंतु त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्‍यक आहे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून जारी झालेल्या परवान्याची मूळ प्रत त्या वाहनावर लावणे अनिवार्य आहे. या परवान्यामध्ये वाहनाचा क्रमांक आणि ज्या उमेदवाराच्या प्रचारार्थ वाहन चालवण्यात येत आहे त्याचे नाव असणे आवश्‍यक आहे. यावर झालेला खर्च उमेदवाराच्या नावावर जमा होतो.

निवडणूक निर्णय अधिकारी / जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून परवाना प्राप्त झाल्याशिवाय वाहन निवडणूक कामांसाठी वापरले जाऊ शकते का ?
नाही. असे वाहन उमेदवाराच्या प्रचारासाठी अनधिकृत समजले जाते. आणि भारतीय दंड संहितेच्या प्रकरण 9 (अ) च्या अंतर्गत कायद्यान्वये शिक्षेला पात्र ठरते आणि त्यानुसार ताबडतोब प्रचाराच्या कामातून वगळले जाते.

मिरवणुकी दरम्यान ठराविक पक्ष किंवा उमेदवाराशी संबंधित फलक/भित्तीपत्रक/बॅनर/झेंडा वाहनावर लावण्यास काही निर्बंध आहेत का ?
मिरवणुकीदरम्यान तुम्ही वाहनावर एखादे भित्तीपत्रक/फलक/झेंडा लावू शकता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.