पंकजा मुंडे, आशिष शेलार, राम शिंदेंना निवडणूक अवघड जाणार

भाजपच्या सर्वेक्षणातील अंदाज

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कबंर कसली आहे. त्यातच आता भाजपचा अंतर्गत सर्वे समोर आला आहे. या सर्वेनुसार भाजपने राज्यातील निवडणुकीत आपला विजय निश्‍चित मानला आहे. त्यात 164 जागांपैकी 122 जागांवर त्यांना विजय मिळण्याचा विश्‍वास आहे. तर 2 मतदार संघात भाजपला पराभवाला समोरे जावे लागणार असल्याचे भाजपच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे

भाजपच्या सर्वेक्षणानुसार बारामती आणि मालेगाव मध्य या दोन ठिकाणी भाजपला पराभव मिळणार आहे. बारामतीमध्ये अजित पवार आणि मालेगाव मध्य मधून कॉंग्रेसचे विद्यमान आमदार आसिफ शेख हे निवडणुक जिंकतील. तर दुसरीकडे भाजपला 40 जागांवरील निवडणूक खडतर जाणार आहे. त्यात 4 विद्यमान मंत्र्यांचा समावेश आहे. यात महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना त्यांचेच चुलत बंधू धनंजय मुंडे यांच्याकडून तगडे आव्हान मिळणार आहे. तर शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांना वांद्रे पश्‍चिम मधून कॉंग्रेसचे आसिफ झकारीया यांच्याकडून तगडी फाईट मिळू शकते असा अंदाज या सर्वेक्षणातून समोर आला आहे.

मंत्री राम शिंदे यांनादेखील ही निवडणूक अवघड जाणार असल्याचे या सर्वेत सांगण्यात आले आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात राम शिंदे यांना रोहित पवार यांचे मोठे आव्हान आहे. यांच्यातील लढत ही अटीतटीची होणार असल्याचा अंदाज व्यक्‍त करण्यात आला आहे. एवढेच नाही तर परिणय फुके यांना साकोली मतदार संघात कॉंग्रेसचे नाना पटोले यांचे आव्हान असणार आहे. त्यामुळे राज्यातील ही निवडणूक या मंत्र्यांना अडचणीची जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.