जगातील 28 देशांत होणार आहेत निवडणुका

युरोपीय देशांनी स्थापन केलेल्या युरोपीय महासंघातील 28 सदस्य देशांत मे महिन्यात निवडणुका होण्याची शक्‍यता आहे. असे असताना भारतात 29 राज्यांत निवडणुका होत आहेत. युरोपीय देशातील निवडणुकांचा परिणाम हा भारताच्या संबंधावर होणार आहे.

भारतात 11 एप्रिलपासून 19 मे महिन्यापर्यंत निवडणूक होत आहेत. 23 मे रोजी त्याचे निकाल लागणार आहेत. भारतात जेव्हा निवडणुकीचे वातावरण थंडावेल तेव्हा युरोप खंडात निवडणुकीचे पडघम वाजू लागतील. या खंडाचा आकार भारतापेक्षा थोडा मोठा आहे. मात्र, लोकसंख्येच्या बाबतीत संख्याबळ हे भारतापेक्षा निम्मेच आहेत. भारतीय संघराज्याची निर्मिती 29 राज्य मिळून झाली आहे. युरोप खंडात मात्र 28 देशांत एकाचवेळी निवडणुका होत आहेत. हे 28 देश एकत्र येऊन महासंघ बनला असून त्याचे नाव युरोपियन यूनियन असे आहे. युरोपियन यूनियनमधील सर्व देशातील लोकसंख्या ही भारताच्या उत्तर प्रदेशच्या लोकंसख्येपेक्षा निम्मीच आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या सुमारे 20 कोटी आहे.

युरोपातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या जर्मनीची लोकंसख्या सुमारे सव्वाआठ कोटी आहे. युरोपीय युनियनमध्ये युरोपातील सर्वच देश सहभागी नाहीत. युरोपीय पार्लमेंटचा विचार केल्यास यूरोपियन युनियनच्या सर्व देशांनी एकत्र येऊन एक संसदेची निर्मिती केली आहे. या संसदेत सध्या 751 सदस्य आहेत.

जर ब्रिटन या निवडणुकीपूर्वीच युनियनच्या बाहेर पडला तर त्याच्या जागांची विभागणी उर्वरित देशात होईल. त्यानुसार नवीन संसदेच्या सदस्यांची 705 संख्या होईल. यूरोपीय युनियन देशातील कायदा आणि सुव्यवस्थेसाठी कायदे तयार करणे हे प्रमुख काम संसदेचे आहे. याशिवाय व्यापाराला प्रोत्साहन देणे, शेती आणि स्थानिक विकासाला चालना देणे, विकासातील अडथळे दूर करणे आदी काम युरोपीय युनियनच्या संसदेला करावे लागते. तसेच 19 देशांत एकच यूरो नावाचे चलन चालते.

या संसदेत सर्व देशांना लोकसंख्येच्या आधारावर प्रतिनिधित्व मिळते. त्याचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड ही संसंदेचे सदस्य हे अडीच-अडीच वर्षासाठी करत असतात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.