निवडणुका डिक्लेर झाल्यात पण माझ्याबाबत अजून काहीच डिक्लेर झालं नाहीये : आठवले

प्रातिनिधिक छायाचित्र

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज एका नामांकित वृत्तसंकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजप-शिवसेना युतीमधील जागावाटपाबाबत मत व्यक्त केलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेने आरपीआयसाठी प्रत्येकी एक जागा सोडण्याची मागणी आपण केली होती मात्र आता आरपीआयला भाजप आणि शिवसेना जागा सोडतील असं चित्र काही दिसत नाही असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे.

यावेळी बोलताना आठवलेंनी त्यांना लोकांमधून निवडून येण्याची इच्छा असल्याचे भाजप-शिवसेनेच्या नेत्यांना सांगितले असल्याचे म्हंटले. ते म्हणाले “आपण ज्या प्रमाणे यापूर्वी १९९८च्या निवडणुकांमध्ये दक्षिण मध्य मुंबईमधून निवडणूक जिंकली होती त्याप्रमाणेच यावेळी आपल्याला यावेळी हा मतदारसंघ देण्यात यावा अशी मागणी केली होती मात्र आता ही मागणी पूर्ण होताना दिसत नाहीये.” भाजप-शिवसेना युतीमध्ये लोकसभेची जागा मिळण्याबाबत आपण आशावादी असलो तरी असे झाले नाही तरी आपण भाजप-शिवसेना युतीतून बाहेर पडणार नसल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)