नवी दिल्ली – कर्नाटक विधानपरिषदेच्या सात आमदारांची मुदत येत्या 30 जून रोजी संपत आहे. त्यामुळे या जागांसाठी विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुक 29 जून रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
त्यानुसार दि. 11 जून रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येईल. 18 जून रोजी अर्ज दाखल करण्याची अखेरचा दिवस असेल.
अर्जाची छाननी दि. 19 जून रोजी करण्यात येणार आहे. अर्ज 22 जून पर्यंत मागे घेता येणार आहेत. तर मतदान 29 जून रोजी होणार आहे. तसेच मतमोजणी त्याच दिवशी म्हणजे 29 जून रोजी होणार आहे.