विजयाची हॅट्ट्रिक साधणार – माधुरी मिसाळ

सिंहगड रस्ता परिसरात प्रचार फेरीला प्रतिसाद

पुणे – गेल्या दहा वर्षांत मतदारसंघात केलेली विकासकामे, मतदारांचा आपल्यावर असलेला भरवश्‍याच्या जोरावर आपण पर्वती विधानसभा मतदारांघातून पुन्हा एकदा विजयाची हॅट्ट्रिक साधणार असल्याच्या भावना महायुतीच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केल्या.

मिसाळ यांच्या प्रचारार्थ हिंगणे-विठ्ठलवाडी-आनंदनगर-माणिकबाग परिसरात प्रचार फेरी काढण्यात आली होती. याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मिसाळ यांनी मतदारांना धन्यवाद देत त्यांच्याशी संवाद साधला. नगरसेविका मंजुषा नागपुरे, ज्योती गोसावी, नगरसेवक प्रसन्न जगताप, श्रीकांत जगताप, हरिश परदेशी, दीपक नागपुरे, विश्‍वास ननावरे, बाळासाहेब कोकरे यांच्यासह शिवसेनेचे अशोक वेल्हाळ, बापूू निंबाळकर, बाळासाहेब कडू, मनीष जगदाळे, राजू चव्हाण, शिवा पासलकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच महिला उपस्थित होत्या.

मिसाळ म्हणाल्या, गेल्या दहा वर्षांत सिंहगड रस्ता परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्याची संधी मिळाली. त्यात प्रामुख्याने शहराचे नवीन पर्यटन स्थळ ठरणारे पु.ल. देशपांडे उद्यानांतील कलाग्राम, सिंहगड रस्त्यासाठीच्या पोलीस ठाण्यासाठी स्वतंत्र नवीन कार्यालयाचे सुरू झालेले काम, वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विठ्ठलवाडी ते फन टाइमपर्यंत कालव्याबाजूचा रस्ता, विठ्ठलवाडी ते वडगाव फाट्यापर्यंत नव्याने होणारा उड्डाणपूल यांसह अनेक उद्याने या भागात करता आली. त्यामुळे मतदारांचा आपल्यावर विश्‍वास असून या विकासकामांच्या जोरावर मतदार आपल्याला तिसऱ्यांदा विजयाची संधी देणार, याची आपल्याला खात्री आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)