राज्यसभेच्या 55 जागांसाठी 26 मार्चला निवडणुक

नवी दिल्ली – राज्यसभेच्या 55 जागांची मुदत संपत असून त्या जागांसाठी निवडणूक आयोगाने 26 मार्च रोजी निवडणूक घेण्याचे ठरवले आहे. 17 राज्यांमधून या जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 26 मार्च अशी आहे. जे 55 सदस्य निवृत्त होणार आहेत त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते मोतीलाल व्होरा, माजी केंद्रीय मंत्री विजय गोयल इत्यादींचा समावेश आहे.

नवीन समिकरणानुसार भाजपच्या काही जागा कमी होण्याची शक्‍यता आहे. अलिकडच्या काळात भाजपच्या हातून काही राज्ये निघून गेली असून काहीं विधानसभांमध्ये त्यांचे संख्याबळ घटले आहे त्याचा फटका या पक्षाला काही प्रमाणात बसण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.