इलेक्‍शन ऑन ड्युटी 65 तास

माण विधानसभा मतदारसंघात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे काम यशस्वी

पळशी – निवडणुका पारदर्शी, नि:पक्षपाती आणि भयमुक्त वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोग मोठ्या प्रमाणात काळजीपूर्वक काम करत असत. निवडणुका म्हटले की अनेक अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या अंगावर काटा येतो. माढा लोकसभा मतदारसंघातील माण विधानसभा मतदारसंघात इलेक्‍शनचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी रात्रीचा दिवस करून काम केले तर काहींनी सलग 65 तास काम करून मोहीम फत्ते केली.

माढा लोकसभा मतदारसंघातील माण विधानसभा मतदारसंघात 372 केंद्रे आहेत. त्या केंद्रावरील व्हीव्हीपॅट मशिन्स व इतर निवडणुकीचे साहित्य 32 टेबलावरून वाटप करण्यात आले. निवडणुका पारदर्शी, नि:पक्षपाती आणि भयमुक्त वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्न करत असत. त्याप्रमाणे या मतदारसंघात काम अधिकाऱ्यांनी काम केले.

सोमवारी सकाळी 7 वाजता कर्मचारी यांना दुसऱ्या तालुक्‍यात दहिवडीतून पाठवण्यात आले. नंतर दिवसभर व्हीव्हीपॅट मशिन्स देण्यात आल्या. त्यानंतर मंगळवार, 23 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान झाल्यानंतर दहिवडी येथे गोडाऊनला रात्री 11 वाजेपर्यंत मतदान केंद्रावरून व्हीव्हीपॅट मशिन्स गोळा करून रात्रभर केंद्राप्रमाणे व्हीव्हीपॅट मशिन्स व बॅलेट युनिट पेटीबंद करून ते सर्व बुधवारी सकाळी सोलापूरला रामवाडी गोडाऊन येथे जमा केले.
यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेरे, तहसीलदार डॉ. अर्चना पाटील, तहसीलदार बाई माने, अन्य अधिकारी व निवडणूक नेमणुकीस असलेल्या कर्मचाऱ्यांनी कष्ट घेतले. कर्मचाऱ्यांबरोबर अधिकाऱ्यांनीही सलग 65 तास काम करून इलेक्‍शन मोहीम फत्ते केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.