आळंदी, – खेड तालुक्यातील चऱ्होली खुर्दच्या सरपंचपदी शालन पांडुरंग पगडे तर उपसरपंचपदी रवींद्र ज्ञानेश्वर कुऱ्हाडे यांची निवड झाली. सरपंच आशा प्रकाश थोरवे आणि उपसरपंच पांडुरंग विठ्ठल थोरवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी सोमवारी (दि. 12) रोजी निवड प्रक्रिया पार पडली.
चऱ्होली खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच निवडीसाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुप्त मतदानातुन शालन पगडे आणि रवींद्र कुऱ्हाडे विजयी झाले. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी राजेंद्र वाघ, तर ग्रामविकास अधिकारी जगन्नाथ जगदाळे, तलाठी महेंद्रसिंग ठाकूर यांनी सहाय्यक म्हणून कामकाज पाहिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.