पुणे : जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड

जिल्हाध्यक्ष शिवदास उबाळे यांची माहिती

वाघोली (प्रतिनिधी) :  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काॅंग्रेस ओबीसी सेलच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून मनोहरदादा उबाळे हायस्कूल येथे नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शिवदास उबाळे यांनी दिली आहे.

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष शिवदासजी उबाळे यांच्या सुचनेप्रमाणे व उपाध्यक्ष चंद्रशेखर परंडवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी संघटन वाढीसाठी खेड, इंदापूर, बारामती व हवेली तालुक्यातील अनेक पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच वसुंधराताई उबाळे या उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे मुख्य संघटक संजयभाऊ जकाते यांनी केले. सदर कार्यक्रमाला पुणे जिल्हा ओबीसी सेलचे खजिनदार राजेंद्र गोरे, आळंदी शहर अध्यक्ष शुभम जाधव यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी ज्ञानदेव शिंदे ( पुणे जिल्हा उपाध्यक्ष, इंदापूर), राजेंद्र जाधव (पुणे जिल्हा उपाध्यक्ष), प्रकाश भुजबळ (खेड तालुका अध्यक्ष), योगेश आगरकर (चाकण शहर प्रमुख), स्वप्ना लोणकर,( पुणे जिल्हा महिला उपाध्यक्ष बारामती), सीमा पांढरे, (बारामती तालुका उपाध्यक्ष), संतोष बोराटे (सरचिटणीस, बारामती तालुका), दादासाहेब विधाटे (उपाध्यक्ष, बारामती तालुका), भानुदास आल्हाट, (उपाध्यक्ष, खेड तालुका), लक्ष्मण सुडे (सरचिटणीस, खेड तालुका), शैलेश जाधव ( मुख्य संघटक,  खेड तालुका), गणेश ताजणे (हवेली तालुका कार्याध्यक्ष, पिंपरी चिंचवड) यांची निवड करण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.