पुणे – महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक शुक्रवारी होणार असून, सकाळी 11 वाजता या निवडणुकीची प्रक्रिया महापालिकेच्या मुख्य सभागृहात होणार आहे.
महापालिकेत एकहाती बहुमत असलेल्या भाजपने महापौरपदासाठी माजी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांना संधी दिली आहे तर, उपमहापौर पदासाठी भाजपच्याच सरस्वती शेंडगे यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, महापालिकेत भाजपचे विक्रमी बहुमत असल्याने निवडणूक ही केवळ औपचारिकता ठरणार आहे.
महापालिकेत शिवसेनेकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने महाशिवआघाडीचे गणित जुळले नाही. त्यावर कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीकडून राष्ट्रवादीचे प्रकाश कदम तर उपमहापौरपदासाठी कॉंग्रेसच्या चांदबी नदाफ यांनी अर्ज दाखल केले आहेत. काढण्यात आलेल्या आरक्षणात महापौरपद हे खुल्या सर्वसाधारण वर्गासाठी आहे. हे पद एक वर्षासाठीच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी आणखी दोघांना पक्षांकडून या पदांसाठी संधी दिली जाणार आहे.