पुणे(प्रतिनिधी) – कॅम्प एज्युकेशन सोसायटीची 2020 ते 2025 या पंचवार्षिक कालावधीकरिता निवडणूक बिनविरोध झाली आहे. बिनविरोध उमेदवारांची नावे वालचंद संचेती, अण्णासाहेब भोसले, बाबुराव जवळेकर, उदय पुंडे, मोहिनी तेलंग, सुभाष अगरवाल, डॉ इम्तियाझ मुल्ला, दिलीप कुमार सराफ, डॉ मिलिंद तेलंग, जवाहरलाल बोथरा, भगवान बेंद्रे, शशिकांत पवार अशी आहेत.
संस्थाचालक या नात्याने विद्यार्थ्यांना अद्ययावत व आधुनिक शिक्षण देणे हे संस्थाचालकांनी नेहमीच ध्येय मानले आहे. कॅम्प एज्युकेशन सोसायटी गेली वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून पुण्याच्या पूर्व भागात गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी एकमेव संस्था आहे.
आज संस्थेच्या भागांमधून पूर्व प्राथमिक पासून ते पदव्युत्तर अभ्यासक्रमात पर्यंत मराठी व इंग्रजी माध्यमातून सुमारे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेत असल्याची माहिती कार्यकारी सचिव दुर्गा विवेक देशमुख यांनी दिली.