निवडणूक निरीक्षक सुरेंद्र झा यांचा निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा 

काळजीपूर्वक काम करण्याच्या दिल्या सूचना 

सातारा – सर्व सहायक निवडणूक अधिकारी, नोडल अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अत्यंत काळजीपूर्व लोकसभा निवणुकीचे कामकाज करावे, अशा सूचना निवडणूक निरीक्षक सुरेंद्र झा यांनी केल्या. लोकसभा निवडणूक-2019 च्या अनुषंगाने सुरेंद्र झा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्‍वेता सिंघल, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्ष प्रमुख साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता आदी यावेळी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी श्री. झा यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक नोडल अधिकारी काय काम करता त्यांच्या आत्तापर्यंतच्या कामाकाजाची माहिती घेऊन भरारी पथकांनी महामार्गावर वाहनांची तपासणी काटोकरपणे करावी. अवैद्य मद्याचा कोठेही पुरवठा होणार नाही यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने काळजी घ्यावी, अशा सूचना केल्या.

निवडणुकीच्या अनुषंगाने भरारी पथाकडून पकडण्यात आलेल्या रोख रक्कमेची माहिती घेवून भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दिव्यांग मतदारांना देण्यात येणाऱ्या सुविधा मतदानाच्या दिवशी उपलब्ध करुन द्या, अशा सूचना करुन मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाने अतिशय चांगले काम केल्याचे सांगून कोणीही मतदानापासून वंचित राहणार नाही यासाठी जनजागृती सुरु ठेवा, असेही श्री. झा यांनी शेवटी सांगितले. या बैठकीला सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.