निवडणूक निरीक्षक सुरेंद्र झा यांनी केली सातारा विधानसभा मतदासंघाची पाहणी

सातारा – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर 45- सातारा लोकसभा मतदार संघासाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक सुरेंद्र झा यांनी 262- सातारा विधानसभा मतदार संघाच्या कार्यालयास भेट देऊन निवडणूक विषयक कामांचा आढावा घेतला. 45 – सातारा लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात तसेच तालुक्‍याच्या सर्व भागात शांततेत मतदान पार पाडण्यासाठी व मतदारांमध्ये निवडणूकविषयी माहिती तसेच निवडणुकीत प्रथमच यंत्राचा वार, मतदारामध्ये त्याबाबत जागृती झाली का ? याची माहिती त्यांनी घेतली.

आयोगाच्या आदेशानुसार राबविण्यात येणाऱ्या निवडणूक कामांचा निवडणूक निरीक्षक सुरेंद्र झा यांनी सातारा विधानसभा मतदार संघात आढावा घेतला. यावेळी सातारा विधानसभा मतदार संघातील केळघर येथील स्थिर निगराणी पथकाची पाहणी केली. तसेच मतदान केंद्र 20-नांदगणे, 22- केळघर, 46 -सावली, 73 – मोहाट, 55 – मामुर्डी, 79, 80 मेढा, 98- बिभवी व 142- मोरावळे येथील मतदान केंद्रास भेट देऊन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशनाप्रमाणे मतदान केंद्रावर सर्व सोयी आहेत अगर कसे याबाबत पहाणी केली.

शाहु क्रीडा संकुल, सातारा येथील मतदान यंत्र ठेवण्यात आलेले सुरक्षा कक्षाची व साहित्य वाटप/स्विकारणे जागेची पाहणी केली. त्यानंतर सर्व अधिकाऱ्याची बैठक घेऊन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशनानुसार निवडणूक सूचनांचे पालन करावे व ही सार्वत्रिक निवडणूक निर्भय व नि:पक्ष वातावरणात पार पाडावी अशा सूचना दिल्या. तसेच जावली तालुक्‍यातील अतिदुर्गम भागातील रवंदी, खिरखिंडी, कारंगाव व वेळे या मतदान केंद्राबाबत विशेष लक्ष देणेबाबत सुचना दिल्या. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.स्वाती देशमुख/पाटील, अतिसहा. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती आशा होळकर व श्रीमती रोहिणी आखाडे उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.