750 महाविद्यालयांत ‘टशन’

पुणे – महाविद्यालयीन आणि विद्यापीठ निवडणुकांचा बिगूल वाजताच आता विद्यार्थी संघटनांनी जय्यत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 750 महाविद्यालयांत या निवडणुका रंगणार आहेत.

यात वरिष्ठ महाविद्यालायातील प्रत्येक वर्गातून सभापती, सचिव, महिला प्रतिनिधी, मागासवर्गीय प्रतिनिधी व वर्ग प्रतिनिधी या निवडणुकांतून निवडला जाणार आहे. अशा पद्धतीने हे पाच प्रतिनिधी विद्यापीठात होणाऱ्या विद्यार्थी निवडणुकांसाठी मतदान करतील. महाविद्यालयांची मतमोजणी महाविद्यालयात, तर विद्यापीठातील मतमोजणी विद्यापीठात होणार आहे.

चार विद्यार्थ्यांची प्राचार्य करतील निवड
महाविद्यालय विद्यार्थी निवडणुकांचा निकाल जाहीर होताच, एनएसएस, स्पोर्टस, एनसीसी, सांस्कृतिक या चार गटांतून प्रत्येकी एक विद्यार्थी नामनिर्देशन अर्थात निवड प्राचार्यांमार्फत केली जाणार आहे. हे विद्यार्थी विद्यापीठ निवडणुकीत मतदान करतील. त्याचप्रमाणे विद्यापीठ निवडणुकीनंतर या चार कोट्यांतून विद्यार्थी विकास मंडळांकडून विद्यार्थी नामनिर्देशित करतील.

निवडणुकीसाठी पात्रता
पूर्णवेळ नियमित प्रवेश विद्यार्थी असावा
ए.टी.के.टी. नव्हे, तर सर्व विषय उत्तीर्ण विद्यार्थी असावा
एकाच वर्गात पुन्हा प्रवेश घेतलेला विद्यार्थी नसावा
कमाल वयोमर्यादा दि.30 सप्टेंबर रोजी 25 वर्षे पूर्ण असावी.
राखीव प्रवर्गासाठी जात प्रमाणपत्र अनिवार्य

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.