तळेगाव नगरपरिषदेतील विषय समित्यांसाठी 30 जानेवारीला निवडणूक

तळेगाव दाभाडे – येथील नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. विषय समित्यांची मुदत 30 जानेवारी रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे गुरूवारी (दि. 28) नगरपरिषदेच्या सभागृहात सकाळी अकरा वाजता विशेष सभा बोलविण्यात आली आहे.

मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे हे पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. स्थायी समिती, सार्वजनिक बांधकाम समिती, शिक्षण समिती, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती, स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य समिती, पाणीपुरवठा आणि जलनि:स्सारण समिती, नियोजन व विकास समिती, महिला व बालकल्याण समिती या समितीचे सदस्य व सभापतीपदांची निवड होणार आहेत.

पुढील पंचवार्षिक निवडणूका डोळ्यासमोरे ठेवून महत्वाच्या समितीवर आपली वर्णी लागावी यासाठी आतापासूनच नगरसेवक विशेष जोरदार तयारीत आहेत. नगरपरिषदेत सत्ताधारी भाजपकडे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष ही दोन्ही पदे आहेत. नगराध्यक्षासह 13 सदस्य संख्या आहे, तर तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती तसेच जनसेवा विकास समिती प्रत्येकी 7 असे पक्षीय बलाबल आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.