भाजपच्या नेत्या मनेका गांधी यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई

नवी दिल्ली – आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल निवडणूक आयोगाने केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या मनेका गांधी यांच्यावर कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गत मनेका गांधी यांना ४८ तासांची प्रचारबंदी घालण्यात आली आहे. उद्या सकाळी दहा वाजल्यापासून निर्बंधित कालावधीसाठी रोड शो किंवा मुलाखत देण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे.

दरम्यान, उत्तरप्रदेश मधील सुलतानपूर येथील प्रचार सभेमध्ये बोलताना मनेका गांधी यांनी मुस्लिम समाजाला थेट इशारा देतानाच, तुम्ही मला मत द्या अगर देऊ नका, मी जिंकणार हे नक्की आहे, मात्र त्यानंतर माझा विजय तुमच्या शिवाय झाला तर मला वाईट वाटेल आणि पुढे मुस्लिम बांधव जेंव्हा माझ्याकडे मदत मागायला येतील तेंव्हा मला देखील विचार करायला लागेल असे त्यांनी म्हंटले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.