मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नुकताच आपला मेकओव्हर केला आहे असून पक्षाच्या अजेंड्याबरोबरच झेंडाही बदल आहे. पक्षाच्या नव्या भगव्या झेंड्यावर मनसेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभारातील राजमुद्रेची प्रतिमा वापरली आहे. यावर काही संघटनांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने मनसेला कारणा दाखवा नोटीस पाठवली आहे.
Maharashtra Navnirman Sena has received a letter from State Election Commission on a complaint filed against MNS’s new flag which bears Chhatrapati Shivaji’s insignia. Commission asks MNS to take appropriate action on the complaint
— ANI (@ANI) February 13, 2020
राज्य निवडणूक आयोगाने मनसेला लिखित स्वरुपात ही नोटीस पाठवली असून यामध्ये त्यांच्याविरोधात आलेल्या तक्रारीवरुन पक्षावर कारवाई क करु नये? याबाबत विचारले आहे. संभाजी ब्रिेगेड आणि मराठा महासंघाने याबाबत तक्रारी दाखल केल्या होत्या.
मनसेने आपल्या नव्या झेंड्यावर छापलेली स्वराज्याच्या राजमुद्रेची प्रतिमा त्वरीत हटवावी अशी मागणी करीत संभाजी ब्रिगेडने पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तसेच जर मनसेने ही राजमुद्रेची प्रतिमा हटवली नाही तर संभाजी ब्रिगेड मनसेविरोधात आपल्या स्टाईलने रस्त्यावर उतरेल, असा इशाराही संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिला होता.