नगर – नगर शहर विधानसभा मतदारसंघात निवडणूक खर्चात त्रुटी आढळल्याने शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड,डाव्या आघाडीचे उमेदवार बहिरनाथ वाकळे यांच्यासह सहा उमेदवारांना निवडणूक आयोगाने नोटीसा दिल्या आहेत.
आज (दि.14) निवडणूक खर्च निरीक्षक श्री.दिक्षित यांच्याकडून 12 उमेदवारांची निवडणुक खर्चाच्या वेळापत्रकानुसार खर्चाची दुसरी तपासणी पुर्ण करण्यात आली आहे.या तपासणीमध्ये 6 उमेदवारांच्या खर्च अहवालामध्ये खर्चामध्ये तफावत आढळुन आली.
उमेदवाराचे नाव व तफावतीची रक्कम पुढीलप्रमाणे:
अनिल रामकिसन राठोड (शिवसेना),तफावत रक्कम-रु.122086,बहिरनाथ तुकाराम वाकळे,(भाकप) , तफावत रक्कम रु.7413,श्रीपाद शंकर छिंदम(अपक्ष), तफावत रक्कम रु. 1429,मीर आसीफ सुलतान ,(एमआयएम) तफावत रक्कम रू. 5568, श्रीधर जाखुजी दरेकर, तफावत रू- 2288 संदीप लक्ष्मण सकट, तफावत रक्कम रु. 3270.
सदर सहाही उमेदवारांना नोटीसा देऊन योग्य त्या पुराव्यासह 48 तासाच्या आत खुलासा सादर करण्याचे निर्देश निवडणूक विभागाने दिले आहेत.तसेच पुढील उमेदवारांची खर्चाची तपासणी दि. 18 तारखेला होणार आहे,असे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.पुढच्या खर्चाच्या टप्प्यात त्रुटी आढळल्यास पुन्हा कारवाई होऊ शकते.