निवडणूक आयोग पूर्णपणे पक्षपात करतोय – राहुल गांधी

निवडणूक आयोग विरोधी पक्षावर कठोरतेची वागणूक करत आहे मात्र जेव्हा भाजप पक्षाकडून आचारसंहितेचे उल्लंघन होते तेव्हा निवडणूक आयोग कुठलेही ठोस कारवाई करताना दिसत नाही. निवडणूक आयोग पूर्णपणे पक्षपात करत आहे. मात्र, निवडणूक आयोगाने काहीही करू देत जनतेने आपले मन बनविले आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

Congress President Rahul Gandhi: Process is going on in Supreme Court and I made a comment attributed to SC so I apologized. I did not apologize to BJP or Modi ji. ‘Chowkidar Chor hai’ will remain our slogan pic.twitter.com/ZQqv72jZNW

यावेळी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत ‘चौकीदार चोर है’ या नाऱ्याप्रकरणी आपले मत मांडले की,’ मी ‘चौकीदार चोर है’ या नाऱ्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाची माफी मागितली  कारण केस चालू असताना मी कोर्टाचा हवाला दिला होता. राफेल प्रकरणी मी ना भाजपची माफी मागितली, ना मोदींची माफी मागितली आहे. आगामी काळात मोदींकडे तरुणांना रोजगार देण्याबाबत कोणतीही योजना नाही. आम्ही न्याय योजनेच्या माध्यमातून गरिबांचा फायदा करुन देत आहोत.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.