नवी दिल्ली – आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल निवडणूक आयोगाने समाजवादी पक्षाचे (एसपी) नेते आझम खान यांच्यावर कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गत आझम खान यांना ७२ तासांची प्रचारबंदी घालण्यात आली आहे. उद्या सकाळी दहा वाजल्यापासून निर्बंधित कालावधीसाठी रोड शो किंवा मुलाखत देण्यास निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे.
Election Commission bars Samajwadi Party (SP) leader Azam Khan from election campaigning for 72 hours starting from 10 am tomorrow, for violating Model Code of Conduct during his election campaign held in Rampur. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/a9GJl385Kk
— ANI (@ANI) April 15, 2019
दरम्यान, रामपूरमधील शाहबाद जिल्ह्यात एका प्रचारसभेला संबोधित करताना समाजवादी पक्षाचे नेते आणि रामपूर लोकसभेचे उमेदवार आझम खान यांनी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासमोरच जयाप्रदांवर टीका करताना आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर आझम खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता.