अब की बार २८० पार : एअर स्ट्राईकचा भाजपाला फायदा 

नवी दिल्ली – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायू दलाने पाकिस्तानस्थित बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करत दहशतवादी तळ उद्धवस्त केले. या एअर स्ट्राईकचा फायदा आता एनडीएला होताना दिसत आहे. एका सर्वेक्षणानुसार, बालाकोटच्या हवाई हल्ल्यानंतर एनडीएला १३ जागांसाठी फायदा होताना दिसतो आहे. याआधी एनडीएला २७० जागा मिळण्याचा अंदाज होता. परंतु, आता हा आकडा वाढला असून २८३ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायू दलाने २६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केले होते. याचा फायदा एनडीएला होताना दिसत असून काँग्रेसच्या जागांमध्ये मात्र घसरण झाली आहे. याआधी काँग्रेसला १४४ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र एअर स्ट्राईकनंतर काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या जागेचा आकडा १३५वर आला आहे. याव्यतिरिक्त तिसऱ्या आघाडीलाही धक्का बसला असून १२९ जागांवरून १२५ जागा मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये बीजेडी, टीएमसी, टीडीपी, टीआरएस आणि वायएसआर कांग्रेस तसेच सपा-बसपा आणि आरएलडी यांचा समावेश आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×