नोएडा – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशातील १८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतील ९१ मतदारसंघांत आज मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर मतदान केंद्राजवळ पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परंतु, नोएडामध्ये एका मतदान केंद्राजवळ निवडणुकीच्या गाडीतून नमो फुड्सचे पॅकेट्स वाटण्यात आले. यावरून आता वाद उफाळला असून काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. वृत्तानुसार, उत्तरप्रदेशच्या राज्य निवडणूक आयुक्त के. एल. वेंकटेश्वर यांनी अहवाल मागविला आहे.
वरिष्ठ पोलीस अधीक्षक वैभव कृष्ण यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकीय पक्षाद्वारे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वाटण्यात येणारे फूड पॅकेट्सचे वृट खोटे आहे. हे फूड पॅकेट्स नमो फूड शॉपमधून आले आहेत. कोणत्याही राजकीय पक्षातर्फे देण्यात आलेले नाही. काही लोक चुकीचे आणि राजकीय हेतूने प्रेरित अफवा पसरवत आहे. तसेच कोणत्याही विशेष हॉटेलमधून जेवण खरेदी करण्याचे आदेश देण्यात आलेले नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
Pictures of NAMO food packets.
When I asked the District magistrate if he would order an enquiry into this, he said, "there is NO NEED" #ElectionsWithNews18 @CNNnews18 pic.twitter.com/160sZ66S2H
— Saahil Murli Menghani (@saahilmenghani) April 11, 2019