पिंपरी – भरधाव वेगातील दुचाकीने धडक दिल्यामुळे पादचारी वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि 3) सकाळी भोसरी येथे घडली. श्रीकृष्ण दिगंबर सुरंगे (वय 25, रा. देवाची आळंदी, ता. खेड जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी दुचाकी चालकाचे नाव आहे.
पोलीस नाईक पी. एस. पेटकर यांनी शुक्रवारी (दि. 3) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनिता अनंत काशीद (वय 65, रा. लांडेवाडी, भोसरी) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
शुक्रवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास अनिता या नाशिक पुणे रोडवरील शीतल बागच्या समोर भोसरी येथे रस्ता ओलांडत असताना आरोपी सुरंगे याच्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अनिता यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.