Nagar | घरात गळफास घेऊन वृद्ध महिलेची आत्महत्या

नगर, (प्रतिनिधी) – घरात गळफास घेवून वृध्द महिलेने आमहत्या केल्याची घटना नगर तालुक्यातील भातोडी पारगाव शिवारात घडली. मंदाबाई किसन काळे (वय ६२) असे आत्महत्या केलेल्या वृध्द महिलेचे नाव आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
मंदाबाई काळे यांनी रविवारी (दि.२५) दुपारी राहत्या घरात गळफास घेतल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना समजल्यानंतर नातेवाईक विक्रम बाबासाहेब लबडे यांनी मंदाबाई यांना उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले.
तेथील डॉ. खेडकर यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे त्यांनी रूग्णालयात ड्यूटीवर असलेले पोलीस अंमलदार गोर्डे यांना दिली.
अंमलदार गोर्डे यांनी दिलेल्या खबरीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार भवार करत आहेत.





