एकता कपूरने 2021मध्ये मिळालेल्या यशानंतर 2022 चीही जोरदार तयारी केली असून पुढील वर्षी तिचे तब्बल 22 प्रोजेक्ट रिलीज होणार आहेत.
2022 मध्ये रिलीज होणाऱ्या आपल्या प्रोजेक्टबाबत एकता म्हणाली, मला हे सांगताना खूपच आनंद होत आहे की मी आणि माझी संपूर्ण टीम पुढील वर्षात 27 हून अधिक प्रोजेक्टची तयारी करत आहे. आमच्याकडे विविध प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यासाठी अद्भूत कंटेंट आहे. यातील काही प्रोजेक्ट तयार असून ते प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहेत.
तर काही प्रोजेक्ट डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये आहेत. वर्डिक्ट-2, मेंटलहुड-एस2, अपहरण-2, बाईस लॉकर रूम, क्लास ऑफ 2021, बारिश-3, ए कोल्ड मेस, फेरी यासारखे प्रोजेक्ट लवकरच रिलीज होणार आहेत. छोट्या पडद्यावरील नागीन-6, कसम तेरे प्यार की-2, कहां हम चले, इतना करो न प्यार मुझे-2 या मालिका तयार आहेत. तसेच चित्रपटांबाबत सांगायचे झाल्यास फ्रेडी, यू टर्न, जर्सी, गुड बॉय, केटीना, शहजादा आदी प्रोजेक्ट रांगेत आहे.