मुंबई – चित्रपट निर्माती टीव्ही सीरियलची क्वीन प्रोड्यूसर म्हणून प्रसिद्ध असलेली एकता कपूर नेहमीच आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते. आता नुकताच एकता कपूरचा एक लेटेस्ट व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे एकदा एकता कपूरला नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
निर्माती एकता कपूरने अलीकडेच रिद्धी डोग्राला भेट देऊन तिच्या नवीन प्रोजेक्टसाठी शुभेच्छा दिल्या. यादरम्यान ती ऑफ-शोल्डर सॅटिन ड्रेसमध्ये दिसली. ज्यावर टाय अँड डाय प्रिंट होता. एकताचा एकूण लूक ग्लॅमरस दिसत असला तरी सोशल मीडियावरील युजर्सना तिचा हा लूक आवडला नसून त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. अनेक यूजर्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.
View this post on Instagram
एकता कपूरचा हा लेटेस्ट व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट केली की, पत्ता द्या तुम्हाला कपडे दान करतो. तर दुसऱ्याने कमेंट करत तुम्ही एवढं कमावून पण असे कपडे का घालता ? असा सवाल केला आहे. स्मार्ट आणि ट्रेंड फॉलो करणारी निर्माती अशी एकताची ओळख आहे. असं असलं तरी कपड्यांवरून ती नेहमीच ट्रोल होत असते.