मुंबई – विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेना आमदार राजन साळवी यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापाठोपाठ शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांसाठी पक्षादेश (व्हिप) जारी केला. तो बंडखोर शिंदे गटालाही लागू आहे.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या (रविवार) मतदान होईल. त्या पार्श्वभूमीवर, शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी पक्षाच्या सर्व आमदारांसाठी व्हिप जारी केला. शिवसेनेच्या सर्व आमदारांनी मतदानात सहभागी होऊन साळवी यांना मतदान करावे, असा आदेश त्याद्वारे देण्यात आला आहे.
उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत शिवसेना खासदारांनी आपली ‘इच्छा’ स्पष्टच सांगितली…
त्या पक्षादेशावरून शिवसेना आणि शिंदे गटात सामना रंगण्याची चिन्हे आहेत. भाजपने याआधीच विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. त्या निवडणुकीवरून राज्यातील राजकारण आणखी ढवळून निघणार आहे.
दरम्यान, बहुमत आमच्याकडे असल्याने सेनेचा व्हीप आम्हाला लागू होत नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
शिंदेंना नेतेपदावरून हटवण्याची कृती बेकायदा – केसरकर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना नेतेपदावरून हटवण्याची कृती बेकायदा आहे. आम्ही कायदेशीर उत्तर देऊ, अशी भूमिका शिंदे गटाने घेतली आहे.
‘…तर आज ‘ही’ वेळ आली नसती’ – शिवसेनेचा फडणवीसांवर पुन्हा निशाणा
शिंदे यांनी 30 जूनला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर शिवसेनेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे एक पत्र जारी केले. त्यामध्ये पक्षविरोधी कारवायांबद्दल शिंदे यांना शिवसेना नेतेपदावरून हटवण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले.