Eknath Shinde Politics : 2024 च्या विधानसभा निवडणुकीत (Eknath Shinde Politics) अनेक प्रमुख नेत्यांना अनपेक्षित पराभव स्वीकारावा लागला. यात माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांचाही समावेश होता. पराभवानंतर बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या विविध समस्या यांसह अनेक मुद्द्यांवर आंदोलने आणि मोर्चे काढून राजकारण पुन्हा तापवले. शेतकऱ्यांसाठी सुरू केलेला लढा अधिक आक्रमक करत त्यांनी सरकारला जेरीस आणले होते. दरम्यान, आता एक महत्त्वाची राजकीय चर्चा समोर आली आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde Politics) शिवसेनेकडून बच्चू कडूंना थेट विधानपरिषद सदस्यत्वाची ऑफर देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. ही चर्चा राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरू असली तरी अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. पूर्वीचे संबंध आणि नाराजी बच्चू कडू यांनी २०२२ च्या राजकीय संकटात एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde Politics) बंडाला सुरुवातीला पाठिंबा दिला होता आणि ते शिंदे गटासोबत होते. मात्र, नंतरच्या काळात त्यांनी शिंदे सरकारच्या काही भूमिकांवर, विशेषतः शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर शिंदे गटाने केलेल्या दाव्यांवर उघड नाराजी व्यक्त केली होती. Eknath Shinde “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले एवढे ठीक आहे, पण शिवसेनेवर दावा करणे टाळायला हवे होते,” असे विधान बच्चू कडू यांनी केले होते, ज्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली होती. ऑक्टोबर २०२४ मध्ये बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे आमदार राजकुमार पटेल यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे दोन्ही नेत्यांमधील संबंधांमध्ये तणाव वाढला होता. विधानपरिषद निवडणुकीची पार्श्वभूमी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी १२ मे २०२६ रोजी मतदान होणार आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया २३ एप्रिल २०२६ पासून सुरू होत आहे. संख्याबळाच्या गणितानुसार, महायुतीला ७ जागा (भाजप ५, शिवसेना २, राष्ट्रवादी अजित पवार गट १) आणि महाविकास आघाडीला १ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेकडे असलेल्या दोन जागांपैकी एक जागा पुण्यासारख्या महत्त्वाच्या भागात येण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेत विधानपरिषदेसाठी ‘धक्कातंत्रा’ची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अनपेक्षित नावे पुढे येऊ शकतात. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे नाव आघाडीवर असले तरी, रवींद्र धंगेकर, डॉ. रोहित टिळक, नाना भानगिरे यांसारख्या नेत्यांसह इतर इच्छुकही सक्रिय आहेत. सध्या विधानपरिषद निवडणुकीसाठी दोन्ही आघाड्यांमध्ये मोर्चेबांधणी सुरू असून, प्रत्येक जागेसाठी चुरस वाढणार हे निश्चित आहे. बच्चू कडू यांच्या संदर्भात (Eknath Shinde Politics) अधिकृत घोषणा कधी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.