मुंबई – ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा पहिलाच दसरा मेळावा बुधवारी वांद्रे-कुर्ला संकुलात पार पडला. या मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री शिंदेंबरोबरच शिंदे समर्थक आमदार, खासदार आणि प्रवक्त्यांनी ठाकरे कुटुंबाला लक्ष्य केले. दरम्यान, मेळाव्यात अनेक मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी बीकेसी मैदानात हजर राहिलेली दिसली. अशातच ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे हे देखील शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते.
यावेळी शरद पोंक्षे म्हणाले,’आज प्रभू श्रीरामाने रावणाला मारलं तो दिवस. अज्ञातवास संपल्यानंतर पांडवांनी शमीच्या वृक्षावरून शस्त्र खाली काढली आणि लढायला सुरुवात केली तो दिवस. असं म्हणत ते पुढे म्हणाले, रावणाचा सख्खा भाऊ बिभीषण याने आपल्याचा भावाविरुद्ध जाऊन रामाला मदत केली. बिभीषणाची सद्सदविवेकबुद्धी जागृक होती. त्याला माहीत होतं की हे धर्म- अर्धमाचं युद्ध आहे. निती- अनितीचं युद्ध आहे. या युद्धात आपल्याला सत्याचीच साथ द्यायची आहे. त्यामुळे रामाकडून कोणतंही निमंत्रण न मिळता बिभीषण आपल्या सख्या भावाविरोधात लढला. त्या बिभीषणाचा कोणीही गद्दार असा उल्लेख केला नाही.’ असेही ते म्हणाले.