Eknath Shinde : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला आज खराब हवामानाचा फटका बसल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. महालक्ष्मी येथून साताऱ्यातील ‘दरे’ गावी जात असताना कल्याण-मुरबाड परिसरात वादळी वारे आणि पावसामुळे हेलिकॉप्टर हवेतच अडकल्याची घटना घडली. (Eknath Shinde) मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे त्यांच्या पीए आणि ओएसडी यांच्यासह हेलिकॉप्टरने साताऱ्याकडे रवाना झाले होते. मात्र, हेलिकॉप्टर कल्याण-मुरबाड पट्ट्यात पोहोचताच अचानक हवामानात बदल झाला. जोरदार वादळी वारे आणि पावसामुळे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण राखणे अवघड बनले. (Eknath Shinde) स्थितीची गंभीरता लक्षात घेऊन वैमानिकाने प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टर मुंबईकडे वळवले. त्यानंतर जुहू विमानतळावर सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे. (Eknath Shinde) या घटनेची माहिती समोर येताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Eknath Shinde) मोठी दुर्घटना टळली (Eknath Shinde) Eknath Shinde : मोठी बातमी..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं; जुहू विमानतळावर सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग कल्याण-मुरबाड हा परिसर डोंगराळ असल्याने खराब हवामानात हेलिकॉप्टर चालवणे धोकादायक ठरू शकले असते. मात्र, पायलटच्या सतर्कतेमुळे उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या सोबतचे सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. (Eknath Shinde)