एकनाथ खडसे, पंकजा मुंडेंवर कारवाई करणार; चंद्रकांत पाटील

सोलापूर : एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांनी पक्ष नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केल्यामुळे त्याच्यावर कारवाई करणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष्य चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ते शुक्रवारी सोलापूरमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

पक्षाविरुद्ध कारवाई खपवून घेतली जाणार नाही असे ते म्हणाले.  भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे जयंती निमित्त परळीत आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे, एकनाथ खडसेंनी पक्षावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

पंकजा यांनी माजी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. चंदकांत पाटील म्हणाले, पंकजा यांना रैलीत सहभागी होऊ नये असे सांगण्यात आले होते. त्यांच्यावर अंडे फेकणार असल्याची पूर्व कल्पना त्यांना देण्यात आली होती.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.