मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अखेर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. शुक्रवारी दुपारी २ वाजता त्यांचा पक्षात प्रवेश होईल, अशी घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. यामुळे भाजपाला मोठा हादरा बसला आहे.
जयंत पाटील म्हणाले कि, एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सदस्याचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांचे आम्ही पक्षात स्वागत करत आहोत. शुक्रवारी दुपारी 2 वाजता त्यांचा पक्षात प्रवेश होईल. प्रवेशानंतर त्यांना काय जबाबदारी दिली जाणार हे ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
Eknath Khadse promoted BJP in Maharashtra over years. I’ve been informed that BJP Leader Eknath Khadse has resigned from his party. We’ve decided to give him an entry in NCP. He will be formally inducted into NCP at 2 pm on Friday: Jayant Patil, NCP Leader & Maharashtra Minister pic.twitter.com/3o1STFi7IH
— ANI (@ANI) October 21, 2020
खडसेंवर भाजपमध्ये अन्याय झाला आहे. त्यांनी पक्षात येण्यासाठी कुठलीही अट ठेवली नसल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले. एकनाथ खडसे पक्षात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढेल, असेही त्यांनी म्हंटले आहे.
खडसे यांच्याबरोबर बऱ्याच जणांची यायची इच्छा आहे. पण करोनाकाळात विधानसभेच्या निवडणुका घेणं परवडणार नाही. पण खडसे यांच्या संपर्कात बरेच आमदार असल्याचे व यथावकाश अनेक आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असा गौप्यस्फोटही जयंत पाटील यांनी केला.