एकनाथ खडसे, पंकजा मुंडेंना संधी नाहीच ! भाजपकडून विधानपरिषदेसाठी ‘हे’ उमेदवार जाहीर

मुंबई :  राज्यात मागच्या काही दिवसापासून चर्चेत असणाऱ्या विधान परिषदेच्या निवडुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज आपले उमेदवार  जाहीर केले. या यादीमध्ये गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रवीण दटके आणि डॉ. अजित गोपछडे यांना संधी देण्यात आली आहे.  तर पक्षातले ज्येष्ठ नेते आणि इच्छुक एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना यावेळी डावलण्यात आले आहे.

दरम्यान, पक्षाच्या या निर्णयावर एकनाथ खडसे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. माझी इच्छा होती. मी विनंतीही केली होती. पण आता पक्षाने निर्णय घेतलाय. जुने नेते डावलून पडळकरांसारख्या व्यक्तीला संधी दिली आहे. त्यांनी गो बॅक मोदी म्हटलं होतं लोकसभेत. मी नाराज तर आहेच. मी पक्षश्रेष्ठींकडे माझी नाराजी व्यक्त केली. यामुळे वर्षानुवर्षं काम केलेले निष्ठावान नाउमेद होतात. माधव भंडारी आहेत, पंकजा मुंडे आहेत, असे अनेक नेते आहेत. दुःख वाटतं, पण पक्षाचा निर्णय झाला आहे. मला इतर पक्षांकडून ऑफर्स आहेत. पण मी राष्ट्रवादी किंवा शिवसेनेत जाण्याचं यापूर्वी टाळलं होतं, असे खडसे म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.