एकनाथ खडसे आमच्या संपर्कात – संजय राऊत

मुंबई  – महाराष्ट्राचे 19 वे मुख्यमंत्री म्हणून तसेच ठाकरे घराण्यातील पहिला मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज शपथ घेणार आहेत. तब्बल 20 वर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेत असल्याने राज्यभरात शिवसैनिकांच्या आनंदाला उधाण आले असून दादरचा परिसर भगवामय झाला आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी  माध्यमांशी संवाद साधतांना सांगितले की,’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना स्वतःहून फोन करून अभिनंदन केल आहे. महाराष्ट्र राज्य पुढे जाण्यासाठी सर्व मदत करण्याचा शब्द पंतप्रधान मोदी यांनी दिला असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, अजित पवार यांच्या सिंचन प्रकरणातील भ्रष्टाचाराचे खंडीभर पुरावे आहेत, असे सांगणाऱ्या नेत्यांनी ते पुरावे रद्दीत विकले, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केली होती. त्याबद्दल विचारलं असता राऊत म्हणाले, “खडसे आमच्या संपर्कात आहेत.” राऊत यांच्या या वक्तव्यामुळे खडसे आता भाजपला सोडचिठ्ठी देणार का याची चर्चा सुरू आहे. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.