नवी दिल्ली – बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट ‘एक व्हिलन रिटर्न्स’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात दिशा पटानी, तारा सुतारिया, जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक मोहित सुरी आहेत. तर निर्माती एकता कपूर आहे. एक व्हिलन रिटर्न्स हा चित्रपट या शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली. चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई पाहता एकता कपूर आणि दिशा पटानी यांनी लाडू वाटले आहेत.
सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘वूमप्ला’ने दिशा पटनी आणि एकता कपूरचा हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिशा पटनी ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तिच्या हातात लाडूंचा डबाही दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिशा पटानी लाडू खाऊ घालताना दिसत आहे. त्याचवेळी व्हिडिओमध्ये एकता कपूरही दिसत आहे.
View this post on Instagram
ती लाडूचे वेगवेगळे बॉक्स देताना दिसत आहे. दिशा पटानी आणि एकता कपूरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दोघींच्या चाहत्यांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. दिशा पटानीचे चाहते व्हिडिओवर कमेंट करून लाडू मागवत आहेत. एका चाहत्याने लिहिले, माझ्यासाठीही लाडू पाठवा. याशिवाय दिशा पटानीच्या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करून त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी 6.75 कोटींची कमाई केली आहे.