मुंबई – नुकताच ‘एक विलन रिटर्न्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात होते. एक व्हिलन चित्रपटानंतर एक व्हिलन रिटन्सची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटात जॉन अब्राहम, अर्जुन कपूर, दिशा पाटनी, तारा सुतारिया, एलेना रोक्साना मारिया फर्नांडीस, जे डी चक्रवर्ती आणि शाद रंधावा हे मुख्य भूमिकेत दिसत आहेत. आता ट्विटरवर अनेकांनी चित्रपटाचे रिव्ह्यू द्यायला सुरुवात केली आहे.
पहिल्यांदा आलेला एक व्हिलन आणि आत्ताचा रिटन्स यामध्ये काही साम्य आहे का हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणात थिएटर्समध्ये जात आहेत. पहिल्या व्हिलनमध्ये अभिनेता रितेश देखमुख आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. त्यामुळे या दुसऱ्या पार्टमधे खलनायकाची भूमिका नेमकं कोणी साकारली हे पाहण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्येच जावं लागेल.
एक व्हिलन रिटर्न्स हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचे ओपनिंग डे कलेक्शन समोर आले आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ‘एक व्हिलन रिटर्न्स’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती दिली आहे. एक व्हिलन रिटर्न्सने पहिल्याच दिवशी 7.05 कोटींचा व्यवसाय केला आहे.आगामी २ दिवसांमध्ये चित्रपट चांगली कमाई करेल अशी आशा प्रेक्षकांना आहे.