#व्हिडीओ : “एक दिवा हुतात्म्यांसाठी”उपक्रमातुन दीपोत्सव साजरा

राजगुरूनगर : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतिकारक हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकात दिपावली निमित्ताने जाणीव परिवार या युवा संघटनेच्यावतीने “एक दिवा  हुतात्म्यांसाठी” या उपक्रमातुन दीपोत्सव साजरा करण्यात आला.

जाणीव परिवार ग्रुपच्या माध्यमातून गेली सहा वर्षांपासून येथील हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकात दीपावली निमित्ताने दीपोत्सवाचे हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकात आयोजन करण्यात येते. यावर्षी या ग्रुपच्या माध्यमातून हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारकाजवळील पटांगणात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. शहरातील नागरिक विशेषतः तरुण तरुणी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

“एक दिवा हुतात्म्यासाठी” या जाणीव परिवार ग्रुपच्या आवाहनाला शहरातील युवक युवतींनी मोठा सहभाग घेतला. शहरातील असंख्य नागरिक दीपोत्सव सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते. जाणीव परिवारातील अतिक सय्यद, अमोल वाळुंज, शैलेंद्र बकरे, अजिंक्य बकरे, ऋषिकेश सारडा, रोहित बेलसरे, श्रेयस अहिरे, ओंकार कहाणे, सौरभ लुणावत, प्रसाद निंबाळकर, हितेश शेटे
अभिजीत घुमटकर, संदिश शिंदेकर, सुमित खन्ना, सुजित डावरे, श्रीराज चव्हाण, अमर टाटिया, मच्छिद्र राक्षे,अभिजीत तापकीर, मयूर पाचारणे रोहित बोरुडे आदीनी संयोजन केले. यावेळी राजगुरू परिवारातील वंशज विलास राजगुरु यांनी या उपक्रमाला भेट देत मार्गदर्शन केले. मयूर पाचारणे यांनी बासरी तर संदिश शिंदेकर यांनी ढोलकी वादन करीत देशभक्ती व भावगीते सादर केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.