शिष्यवृत्ती परीक्षेत ज्ञानदीप स्कूलच्या अठरा विद्यार्थ्यांचे यश

शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत शिक्षकवर्ग

वाई – ज्ञानदीप इंग्लिश मीडिअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश प्राप्त करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या परीक्षेत इयत्ता आठवीतील जीवन संजीत कारंडे राज्यात 7 वा, कु. सई कैलाश वैद्य राज्यात 14 वी, कु. रिध्दी गणेश सुर्वे राज्यात 16 वी, वेदांत दीपक लेंभे राज्यात 18 वा क्रमांक प्राप्त केला.

तसेच अनुजा शैलेंद्र भोईरे जिल्हयात 16 वी, कु. साक्षी सचिन पवार जिल्हयात 25 वी, आदित्य संदीप जगताप जिल्ह्यात 38 वा, प्रतिक अनिल थोपटे जिल्ह्यात 83 वा, कैफ फारुक मोमीन जिल्ह्यात 158 वा, कु. मृणाल योगेश परचुरे जिल्ह्यात 162 वी, प्रसाद सतिश जाधव जिल्ह्यात 178 वा, सार्थक सचिन टपळे जिल्ह्यात 190 वा, संस्कार लालासाहेब शिंदे जिल्ह्यात 215 वा, कु. साक्षी विजय ढगे तालुक्‍यात तिसरी आली आहे.

इयत्ता पाचवीमध्ये शिकणारी कु. अवनी सुनील देशपांडे जिल्ह्यात 38 वी, कु. समीक्षा सचिन राऊत जिल्ह्यात 74 वी, शिवम महेंद्र माने जिल्ह्यात 94 वा, कु. अंकिता राजेंद्र वाघ जिल्ह्यात 238 वी आली आहे. भविष्यात ज्ञानदीपमधील विद्यार्थी मोठ्या स्पर्धा परीक्षेत नक्कीच चमकतील व शाळेचे नाव मोठे करतील असे उद्गार शाळेचे सचिव चंद्रकांत ढमाळ यांनी काढले. या यशाबद्दल गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, गट शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे, शिक्षण विस्तार अधिकारी-विष्णु मेमाणे, केंद्रप्रमुख सौ. निर्मला भांगरे तसेच शाळेचे मुख्याध्यापक योगेश परचुरे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले. संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण पवार यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विभागप्रमुख सौ. मिनाक्षी चौधरी तसेच, शुभांगी पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक विश्‍वनाथ पवार, अध्यक्ष बाळकृष्ण पवार उपाध्यक्ष विजय कासुर्डे, सचिव चंद्रकांत ढमाळ, खजिनदार एकनाथ जगताप, विश्‍वस्त जिजाबा पवार, प्रा. दत्तात्रय वाघचवरे, दत्ता मर्ढेकर, रवींद्र केंजळे, किसन तपकिरे, चंद्रकांत शिंदे, दिलीप चव्हाण, सर्व शिक्षक, कर्मचारी वृंद, पालक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.